धर्म प्रवास करतात हे सर्वांना ठाऊक आहे. पण हे धर्म स्वतःचे अनुवाद निरनिराळ्या संस्कृतीत आणि भाषेत कसे करतात? भाषांतराच्या प्रक्रियेत धर्माचे स्वरूपच बदलू जात का? या आमच्या सोबत आणि भाषांतर, धार्मिक परिवर्तन तसेच बदलत्या स्वत्वाबद्धलचे लेखन यामध्ये असलेल्या चित्तवेधक दुव्यांचा शोध करा.
ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिक संकल्पना, कर्मकांडे आणि धार्मिक ग्रंथ यांचा प्रसार व्यापार आणि संवाद यांच्या माध्यमातून लोकांकरवी जगभर झाला.परंतु अगदी भिन्न मते आणि आचार असलेल्या जनसमुदायाला सर्वस्वी नवीन संकल्पना किंवा धर्माचे आकलन कसे होते? थोडक्यात विविध धर्माचा प्रचार किंवा त्याचे आकलन निरनिराळ्या संस्कृती आणि भाषांमध्ये कसे होते कि भाषांतराच्या या प्रक्रियांमुळे धर्मच रुपांतरीत होतात? तसेच पवित्र्याच्या नवीन संकल्पनांना निरनिराळ्या व्यक्ती कसा प्रतिसाद देतात? अशा काही महत्वाच्या प्रश्नांचा अंतर्भाव या प्रकल्पात करण्यात आला आहे, ज्याद्वारे धार्मिक बदलाच्या कल्पना आणि अनुवादाद्वारे होणारे स्वपरिवर्तन याचा उहापोह येथे करण्यात येणार आहे. भाषांतराद्वारे धार्मिक श्रद्धांच्या कल्पना आणि त्यांचे प्रकार यांचे स्थलांतर आणि प्रवास कसा झाला याचा तपास घेणे हे तसे व्यापक आणि अमूर्तपणाचे काम आहे. धार्मिक संक्रमणाच्या संकल्पनांचा सर्वाधिक चांगल्या पद्धतीने विचार करण्यासाठी वर उल्लेखिलेला बदल सूचित करणाऱ्या व अभ्यासण्यासाठी उपलब्ध असलेल्या एका पुराव्यावर या प्रकल्पात भर देण्यात आला आहे. तो म्हणजे धार्मिक परिवर्तन दाखविणारी आत्मचरित्रात्मक कथने. त्यांचा उपयोग आपल्याला धार्मिक बदलांच्या प्रक्रियांचा विविध दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी करून घेता येईल. इथे आपण “धार्मिक परिवर्तन” या संकल्पनेचा वापर व्यापकदृष्ट्या आणि धर्मसंस्था तसेच धार्मिक श्रद्धांच्या पद्धतींवर अनुवाद प्रक्रियेचा काय आणि कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी करणार आहोत.