१७०६ साली जर्मन धर्मप्रचारकांच्या आगमनाबरोबर भारतात प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मांतर सुरु झाले. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या चढत्या कालावधीतही हे चालू राहिले. आत्मनिरीक्षण, अंतरदृष्टी आणि वैयक्तिक परिपक्वतेपर्यंत “वाढ” या गोष्टी अधोरेखित करणाऱ्या धार्मिक आचरणाला प्रोटेस्टंट पंथाने विशेष महत्व देणे सुरु केले. वैयक्तिक जीवनाच्या दिशेने झालेल्या या बदलाचे आकलन विविध प्रकारच्या “जीवन लेखन” पध्दतीकडे वळलेल्या विशेषतः अठराव्या शतकात प्रारंभ झालेल्या आत्मचरित्रांद्वारे करता येतो. भारतीयांद्वारे लिहिली गेलेली ही धर्मांतराची कथने पुस्तक, पुस्तिका, पत्रिका नियात्कालीन लेख, डायरी, लेख आदींच्या रुपात प्रकाशित झाली. त्यांची जर्मन, इंग्लीश व अन्य भारतीय भाषांमध्ये करण्यात आलेली भाषांतरे नंतर भारतात आणि युरोपात पसरली. भारताच्या इतिहासात धार्मिक परिचयाचे गठन हा राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महत्वाचा विषय राहिला आहे. कारण, धार्मिक संलग्नता, धार्मिक परिवर्तन आणि धार्मिक परिचय यांचा प्रत्यक्ष परिणाम भारत राष्ट्राच्या प्रगतीवर होत आला आहे. राजकीय चर्चाविश्वाच्या घडणीमध्ये व भारतीय समाजाच्या मह्नुंच्या ओळखीमध्ये धार्मिक पंथांचा परिचय पूरक अथवा स्पर्धक रुपात घडवण्यास “धर्मांतराचे राजकारण” हे उत्तरवसाहत काळापासूनच सहाय्यभूत ठरले आहे. उदाहरणार्थ जातीय राजकारणात आणि विसाव्या शतकात हिंदू राष्ट्रवादाचा एक प्रभावी विचारधारा म्हणून उदय होण्यामध्ये धर्मांतराची महत्वाची भूमिका आहे. भारताच्या विविध राज्यांमध्ये केलेली धर्मांतर विरोधी कायद्यांची अंमलबजावणी आणि अलीकडच्या काळात विश्व हिंदू परिषदेने चालवलेले “घरवापसीचे” कार्यक्रम आपल्याला हे दाखवून देतात कि धर्म परिवर्तन हे समकालीन भारतीय राजकारणाचे व्यवछेदक लक्षण राहिले आहे.

Velankanni kamavrksa
भारतामध्ये अठराव्या शतकाच्या धर्मांतराचा प्रदीर्घ इतिहास असून देखील धर्मांतराची कथने स्वपरिवर्तनाच्या दृष्टीने प्रेरित नव्हती.अठराव्या शतकाच्या अंतापर्यंतचे धर्मांतराचे कथन निरीक्षकांच्या किंवा चरित्रलेखकांच्या दृष्टिकोनापासून (तून) रचले गेले आहे. हे कथन हस्तलिखित प्रतींमध्ये किंवा ग्रंथांच्या अंश रुपात धर्मप्रचारकांकरवी छापलेल्या खंडांमध्ये सापडतात.धर्मांतरित व्यक्तीद्वारे लिहिल्या गेलेल्या आत्मचरित्रांची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी होऊन ती विसाव्या शतकाच्या समाप्तीपर्यंत रचली गेली.विसाव्या शतकाच्या समाप्तीस आणखी एक बदल दिसून येतो – इंटरनेटवर प्रकाशित झालेल्या धर्मांतराच्या कथानांमध्ये लिखित मजकुरासोबत दृकश्राव्य चित्रही दिसतात. आमचा भर छापील ग्रंथांकडे असल्याने या प्रकल्पाची व्याप्ती १९४७ सालापर्यंत ठेवली आहे.

Map of South India, 1717

Map of South India (Source: An account of the religion, manners, and learning of the people of Malabar in the east Indies, London 1717)

जर्मनीच्या लुथरन परंपरांमध्ये असलेले तसेच पायटिस्ट सुधारक चळवळीमध्ये असणारे भारतातील पहिले प्रोटेस्टंट धर्मप्रचारक देवासमोर वैयक्तिक समर्पण व देवासमोर एक जीवलग संबंध शोधण्यावर जोर देत. या मंडळांमध्ये एका व्यक्तीचे “साधारण” ख्रिस्ती धर्मापासून “सत्य” ख्रिस्ती धर्माकडे झालेल्या संक्रमणाचे कथन लुथरन पंथाच्या आत्मनिरीक्षक कथनाचे भाग ठरले. भारतात सुरुवातीला रचल्या गेलेल्या आत्मचरित्ररुपी धर्मांतर कथनांचे तसेच

भारतातल्या जर्मन धर्मप्रचारकांनी रचलेल्या धर्मांतर कथनांचे आदर्श म्हणून जर्मनीतल्या पायटीस्ट पंथीयांच्या आत्मचरित्रांचे विश्लेषण येथे करण्यात येईल. पुढील काळातील धर्मांतरीतांचे धर्मांतराबद्धलचे आकलन व त्याची उभारणी करण्यासाठीचे महत्वाचे वैचारिक व ऐतिहासिक संदर्भ म्हणून धर्मांतराच्या आत्मचरित्रपर लिखाणाच्या या उभरत्या इतिहासाचे महत्व आहे.

Aaron

Aaron (Source: Franckesche Stiftungen, Halle [urn:nbn:de:gbv:ha33-1-35320])

या कालखंडात धर्मपरिवर्तन केलेल्या व्यक्तींची असंख्य आत्मकथने अनेक भारतीय भाषांमध्ये लिहिली आणि प्रकाशित केली गेली. विविध स्वरुपात त्याचा प्रसार घडून आला.एकोणिसावे शतक समाप्त होत असताना औपचारिकरित्या छापली गेलेली आत्मचरित्रे, लोकांच्या वापराकरिता रचण्यात आलेले कबुली जबाबाच्या पुस्तिका, प्रादेशिक आणि राष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले लेख, जीवन चरित्रांच्या स्वरुपात छापली जाणारी पत्रे आणि डायरी लेख आदि बाबींच्या स्वरुपात हा प्रसार घडून आला. ख्रिस्ती धर्माकडे लोकांचे लक्ष वळविण्यासाठी तसेच त्यांना आदर्श धर्माचा नमुना देण्यासाठी काही त्रोटक पत्रीकांचाही प्रसार करण्यात आला. या पत्रिका इंग्लिश आणि भारतीय भाषांमधून प्रकाशित केल्या जात. पत्रिकांचा जास्त प्रसार घडून येण्याच्या उद्धेशाने त्यांचा इंग्लिशमध्ये अनुवाद केला जाई. यावरून हे स्पष्ट होते कि, एकोणिसाव्या शतकाच्या अंतापासून ख्रिस्ती धर्माच्या प्रोटेस्टंट धर्मामध्ये नवप्रवेश केलेल्यांनी आपल्या नव्या धार्मिक जाणीवा आत्मचरित्रासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या स्थापित साहित्य रुपात व्यक्त करू इच्छित होते. धार्मिक आणि सामाजिक परिचयाचे रुपांतर व भाषेच्या वापरातील बदल आणि वाङमयीन शैलीतील बदलाद्वारे कसे दिसून येतात याचेही विश्लेषण या प्रकल्पातंर्गत करण्यात येईल.

Marathi Bible title page

Marathi Bible title page (Source: H. Israel, 2015)

धर्मांतराची कथने भारतातल्या अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. यामध्ये काही वारंवार इतर भारतीय भाषांमध्ये आणि युरोपीय भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. या प्रकल्पात तामिळ आणि मराठी कथनांवरच लक्ष केंद्रित करण्याची अनेक करणे आहेत. पहिले, आमच्या संशोधनासाठी निवडलेल्या कालखंडात लेखन, भाषांतर आणि छपाईचा वेगाने विकास होत असताना मद्रास व मुंबई इलाख्यांमध्ये या दोन महत्वाच्या भाषा होत्या. या दोन्ही भाषांमध्ये भरपूर धर्मांतराचे लेख असल्यामुळे आमच्या दृष्टीने अभ्यासाच्या इतिहासाच्या निरनिराळ्या काळातील अनेक लेख त्या आम्हाला देऊ करतात. दुसरे, प्रोटेस्टंट धर्मप्रचारकांनी भाषांतरासाठी वापरलेली पहिली भारतीय भाषा म्हणजे तामिळ होय.

तमिळमधील छपाईचा इतिहास अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून आहे. या व्यतिरिक्त इंग्लिश आणि जर्मन या दोन्ही भाषांमध्ये भाषांतरित झालेली ही एकमात्र भारतीय भाषा आहे. तिसरे, मराठीतील लेखन स्कॉटीश मिशनरी सोसायटीच्या पत्रव्यवहाराशी आणि हस्तलिखीतांशी संबंधित असून त्यांना नॅशनल लायब्ररी ऑफ स्कॉटलंड आणि एडिनबर्ग युनिवर्सिटी जिथे हा प्रकल्प चालू आहे, त्याच्या ग्रंथालयात संग्रहित करण्यात आलेले आहे.

Tamil bible title page

Tamil bible title page (Source: Franckesche Stiftungen, Halle)

अठराव्या शतकापासून दक्षिण आशियाच्या जनसमुदायांमध्ये घडणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि बौद्धिक पुनःघटनेमुळे व्यक्तीजीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रात बदल घडू लागले. हे बदल अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा घडून आले. या बदलांचे वर्णन करण्यासाठी नवा शब्दसंग्रह विकसित करणे आवश्यक ठरले. हा नवीन शब्दसंग्रह निर्माण करण्यासाठी तामिळ व मराठी लेखकांनी संस्कृत किंवा इंग्लिश भाषेमधून शब्दांची उसनवारी केली. धर्मांतराच्या या लेखनाला इंग्लिश आणि जर्मनमध्ये किंवा तामिळ आणि मराठीमध्ये आपापसात भाषांतर करताना वापरलेल्या धार्मिक भाषेची तपासणी करण्याची आमची योजना आहे. धर्मांतराबद्धलचे लेखन आणि भाषांतराद्वारे ख्रिस्ती संकल्पना भारतीय श्रोत्यांकडे कशा पोहोचल्या तसेच या तीन शतकांमध्ये कशा विभिन्न प्रकारे ख्रिस्ती धर्मांतराला व्यक्त करण्यात आले याचे निरीक्षण याठिकाणी केले जाईल.