आम्ही कशाचा अभ्यास करतो आणि कसा करतो?
पुढील दोन वर्ष धार्मिक संस्कृती व ओळखी घडवण्याच्या बदलण्याच्या भाषांतराच्या स्वरूपावर भर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. विविध भाषांमधील धार्मिक मूल्यांचे व संकल्पनांचे भाषांतर आणि आणि भाषांतराचे स्वरूप यामधील दुव्यांचा शोध घेण्याचे काम आमचा अभ्यास गट करेल. भाषांतर, धर्म आणि साहित्याबद्धलचे प्रश्न एकवटून काही महत्वाच्या प्रश्नांना जन्म देतात. परंतु, हे प्रश्न आम्हाला त्यांचे सामायिकत्वाचे वाचन करण्याचे नवीन मार्ग व दिशा देतील अशी आशा आहे.
भाषांतर आणि धर्मांतर सरतेशेवटी बदल व रुपांतराच्या प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे सांकल्पनिकदृष्ट्या (संकल्पनात्मकदृष्ट्या) जोडलेले आहे. मग तो (बदल) एका भाषिक संस्कृतीतून दुसऱ्या भाषिक संस्कृतीतला बदल असो अथवा एका धार्मिक संस्कृतीतून दुसऱ्या धार्मिक संस्कृतीत होणारा बदल दोन्हीसाठी बदल हा जरी पायाभूत असला तरी परिवर्तनं नेमकी का व कशी घडतात याची स्पष्टता आपल्याला दरवेळी असेलच असे नाही. तथापि या दोन्ही परिवर्तनाच्या गोष्टी आपल्याला मोठ्या प्रमाणावर भाषेमधून उपलब्ध असल्याकारणाने एका धार्मिक स्थितीमधून दुसऱ्या धार्मिक स्थितीमधील संक्रमनासोबत येणाऱ्या भाषा निवडीमधील बदलाचा अभ्यास करणे हा पुढे जाण्याचा एक मार्ग राहतो.
अशा काही संज्ञा आहेत ज्या साधारणपणे धार्मिक वा पवित्र्याच्या विश्वाशी जोडतो. उदा. देव, आत्मा, निर्वाण धर्मग्रंथ किंवा स्वर्ग आणि नरक इ. परंतु, यातील प्रत्येक संज्ञेचा, वेगवेगळ्या धार्मिक व सांस्कृतिक संदर्भात तसे एका धर्माच्या विविध शाखानांही वेगवेगळा अर्थ लागू शकतो. अर्थाबद्धलची एक वाक्यता व मतभेद जिथ स्पष्टपणे दृष्टीस पाडतात अशा भाषांतराच्या कृतीमध्ये धार्मिक परंपरांमधील तात्विक मतभिन्नता स्वाभाविकपणे प्रकट होतो. प्रत्येक संज्ञेला एका धर्मातून दुसऱ्या धर्माकडे घेऊन जाणारा असा एक निश्चित अर्थ आहे. अशाप्रकारे संज्ञांचे वैश्विक सार्वत्रिकरण करून वापरण्याच्या आपल्या कृतीचा अर्थ काय?
जाणीवपूर्वक एका धर्मव्यवस्थेतून दुसऱ्या गेलेला मनुष्य हे भाषांतर अर्थात एका भाषिक आकलन विश्वातून दुसऱ्यात जाणे कसे निर्देशित करतो? या भाषांतरामध्ये काय गमावलं अथवा मिळवलं जातं?
वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये आणि वाङमयीन परंपरांमध्ये धर्मांतर व धार्मिक ओळखी वेगवेगळ्या पद्धतीने तयार केल्या जातात का? तसेच इंग्रज किंवा जर्मन त्याच पुनर्घठन करताना हे वेगळेपण तसच ठेवलं जातं का मिटवलं जातं? या गोष्टीची तपासणी आपण करणार आहोत. भारतीय तसेच जर्मन व इंग्रजी साहित्यातील आत्मकथन परंपरांमधील वेगळेपणाने भाषांतर प्रक्रियेवर कोणते निर्बंध लादले याचे विश्लेषण करण्याची संधी यामुळे आपल्याला प्राप्त होईल. ही आत्मकथने धर्मांतराबद्धलच्या कमीतकमी अजून एका कथन प्रकाराच्या सहाय्याने अभ्यास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या इलाख्यांमधील धर्मांतराच्या संख्यात्मक पुराव्या व्यतिरिक्त त्याविषयी सातत्याने अधिकृत (संस्थात्मक) दृष्टीकोन देणारे हे लिखाण म्हणजे मिशनरी कथने.
दक्षिण आशियात अठराव्या शतकात भाषांतर संकल्पना आणि भाषांतर पध्दती यांच्या येण्यामुळे भारतीयांची भाषा, धर्म व स्वतःची ओळख याविषयीच्या आकलनामध्ये मुलभूत बदल झाला का या गोष्टीचा शोध आपण घेणार आहोत. धार्मिक संस्था व ओळख यांच्याविषयी दक्षिण आशियायी बदलीकरणाच्याच्या प्रक्रियेला नवीन असे काही भाषांतर प्रश्न विचारण्याची आमची योजना आहे. उदाहरणार्थ, अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतीय भाषांमध्ये व भारतीय भाषांमधून ‘पवित्र ग्रंथ’ भाषांतरित करण्याच्या युरोपीय विद्वानांच्या कार्यामध्ये दक्षिण आशियामध्ये धार्मिक संकल्पना रचण्याचे, त्याच्या व्याख्या करण्याचे व त्यांना विचारबद्ध करण्याचे नवीन मार्ग उपलब्ध झाले का? आमचं असं म्हणणं आहे कि भारतीय संदर्भामध्ये धर्म ज्या पहिले जाऊ लागले, तुलना केले जाऊ लागले त्यामध्ये भाषांतराची ही सांकल्प्निकता अंगभूत आहे. मुलभूत (गाभ्याच्या) अशा संकल्पना भाषांतरित केल्या जाऊ शकल्या कि नाही ही गोष्ट बऱ्याचदा युरोपीय विद्वानांनी धर्म हा धर्म म्हणून पाहिला होता कि नव्हता याची निश्चिती करणारी असते.
चार भाषांच्या भाषांतर प्रक्रियांची तुलना करताना नवीन तंत्रज्ञान आणि मुद्रणपद्धतीमुळे प्रभावित झालेल्या भाषांतरित धर्मांतर कथानांच्या निवड, प्रकाशन व वितरणामार्फत धार्मिक सीमारेषा व धार्मिक परिघांची रचना/आखणी कशी केली जाते याचा शोध घेण्यास मदत होईल.
ज्यांनी भारतीय भाषांचे आपसातील प्रचलित संबंध मोठ्या प्रमाणावर बदलण्यास (उदा. अभिजात संस्कृत व आधुनिक भारतीय भाषातील) तसे धार्मिक ज्ञानप्रवाहांचे पारंपरिक प्राकार (प्रकार नव्हे) बदलण्यास कारणीभूत झालेल्या वासाहतिक भारतात आणलेल्या नवभाषांतर पद्धतींचा देखील आपण अभ्यास करणार आहोत.
भाषा व्यवस्था या सांकाल्प्निक विश्व तयार करतात या गृहीतकापासून आपण सुरुवात केली तर वेगवेगळ्या भाषांमध्ये धार्मिक संकल्पना कोणत्या थरांपर्यंत वेगळेपणाने उत्क्रांत होत राहतात आणि या संकल्पना एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करणे काय स्तरापर्यंत शक्य आहे. ‘पावित्र्य’ हे भाषेमार्फत अभिव्यक्त होत असल्याने व अनुभवले जात असल्याने धर्माची सहअनुभूती ही सामायिक भाषेच्या संमतीची मागणी करते. पण धर्मांतराच्या संदर्भात विचार करता – जेव्हा मनुष्य एका भाषेचा वापर दोन वेगवेगळ्या धर्म व्यवस्थांना संदर्भित करण्यासाठी करतो तेंव्हा काय होतं?यामध्ये निव्वळ प्ररुपामधील दुरुस्ती अभिप्रेत आहे का?जर धर्मश्रद्धा ही भाषेच्या एका प्रारूपामध्ये अनुभवली जात असेल तर भाषेचे वेगळे प्रारूप वापरल्यास धर्मश्रद्धेच्या अनुभवामध्ये फरक पडतो काय? कि धर्मश्रद्धेच्या स्वरूपातच फरक पडतो असा प्रश्न आहे.